उस्मानाबाद(प्रतिनिधी) 

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात १४जानेवारी रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचा२८वा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला यावेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमाचे पुजन प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे हस्ते करण्यात आले.

नामांतर चळवळ या विषयावर बोलताना मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डाॅ.शिवाजीराव गायकवाड म्हणाले की बाबासाहेबांच्या बुध्दीला जगात मानले जाते म्हणूनच त्यांचे अनेक देशात पुतळे आहेत दलितांच्या न्याय,हक्कासाठी बाबासाहेबांनी अनेक आंदोलने अहिंसेच्या मार्गाने केले परंतु मराठवाडा विद्यापीठाला त्यांचे नाव द्यावे म्हणून पदिर्घ काळ नामांतर चळवळ राबवावी लागली त्यात अनेकांनी आपली आहुती दिली नामांतरासाठी हिंसा झाली हे दुर्दैव आहे अखेर शरदचंद्रजी पवार साहेब यांचेमुळे नामविस्ताराची घैषणा झाली आणि १४जानेवारी१९९४साली नामविस्तार झालाबाबासाहेबांनी मराठवाड्याचे अज्ञान,दारिद्र्य दूर व्हावे यासाठीच मिलींद महाविद्यालयाची स्थापना केली त्यामुळे बहुजनांचे तरूण तेथे शिक्षण घेउन विविध क्षेञात नेतृत्व करत आहेत. आज विद्यापीठाच्या गेटवर प्रवेश करतानाच गोर,गरिब विद्यार्थ्यांना एक वेगळीच प्रेरणा मिळते आहे.आजच्या विद्यार्थ्यांनी डाॅ.बाबासाहेबांचे विचार डोक्यात घ्यावेत असे शेवटी आवाहन केले.

यावेळी प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके,उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी,प्रा.केशव क्षीरसागर,प्रा.डी.एम.शिंदे उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,निवडक विद्यार्थी,कर्मचारी कोरोना नियमाचे पालन करत उपस्थित होते


 
Top