तुळजापूर/प्रतिनिधी-

 सोलापूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनास सायकलवरुन जाणाऱ्या  पक्षीमिञांचे तिर्थक्षेञ  तुळजापूरात आगमण होताच त्यांचे देविची प्रतिमा देवुन कवड्याची माळ घालुन सत्कार  करण्यात  आला.

 या संमेलनासाठी बहार नेचर फाउंडेशन या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या पक्षीमित्र वर्धा ते सोलापूर हें अंतर सायकल ने प्रवास करत संमेलनात  पोहोचणार आहेत. यांच्या प्रवासात  अंबेजोगाई व लातूर येथील पक्षीमित्र त्यांच्या प्रवासात सामील झाले आहेत.   बहार नेचर फाउंडेशन संस्थेचे माजी अध्यक्ष प्रा. किशोर वानखेडे, माजी सचिव दिलीप विरखेडे,  सदस्य गुडेवर, देवर्षी बोबडे, अंबेजोगाई येथील खागोल अभ्यासक हेमंत धानोरकर आणि वन्यजीव छायाचित्रकार व पक्षीमित्र धनंजय गुट्टे सायकल प्रवास करत तुळजापूरला पोहोचले. त्यावेळी रुग्णकल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले, सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार बोंदर यांनी देवींची प्रतिमा आणि कवड्याची माळ घालून सत्कार केला. 

 
Top