तुळजापूर/प्रतिनिधी-

 शक्तीदेवता कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या  शाकंभरी नवराञोत्सवास श्रीगणेश ओवरीत विधीवत घटस्थापना करण्यात येवुन मंगलमय   वातावरणात आरंभ  झाला. नवराञोत्सवाचा प्रथम माळे दिनी  श्रीतुळजाभवानी मंदीर गर्भगृहासह आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते.

 श्रीतुळजाभवानी मंदिर   पहाटे २ वाजत उघडण्यात आल्यानंतर २.१५ ते २.२३ दरम्यान  चरणतिर्थ करण्यात आले. नंतर पुजेची घाट देण्यात  आल्यानंतर  पुजेस हाक मारण्यात आली.नंतर  श्रीदेविजीची ३.१५ ते ३.३० दरम्यान  सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.नंतर चार ते पाच दरम्यान देविजीस  पंचामृत स्नान , शुध्द स्नान , घालण्यात आल्यानंतर आरती धुपारती करण्यात आली 

 सकाळी सहा  वाजता श्रीदेविजांची नित्याची पूजा  सुरु करण्यात आली. यात सकाळी प्रथम यजमान प्रविण कदम यांची   श्रीखंडाचा  सिंहासन पुजा करण्यात आल्यानंतर मंहत चिलोजीबुवा, मंहत तुकोजीबुवा,  दत्ताञय भोसले, शिवराज पाटील यांच्या सिंहासन पुजा करण्यात आल्या.  त्या संपल्यानंतर श्रीदेवीजींची मुर्ती स्वच्छ करण्यात आल्यानंतर देवीजींना वस्ञोलंकार घालण्यात आले. नंतर सकाळी साडे अकरा वाजता विधीवत  घटकलशाचे पुजन श्रीगोमुख तिर्थकुंडा जवळ करण्यात आले. हा घटकलश पारंपारिक वाद्यांचा गजारात   मंदीरात आणण्यात आला.  श्री  गणेश ओवरीत यजमान प्रविण कदम व त्यांच्या सौभाग्यवती मंजुषा   कदम यांच्या हस्ते    श्री शाकंभरी देविची प्रतिमा लगत प्रतिष्ठापीत करुन येथे घटस्थापना करण्यात येवुन शाकंभरी नवराञोत्सवास आरंभ झाला. 

यावेळी मंहत तुकोजीबुवा, मंहत हमरोजी बुवा, मंहत वाकोजी बुवा,   पाळीचे भोपे-पुजारी प्रशांत संभाजीराव  पाटील  कदम , धार्मिक व्यवस्थापक  नागेश शितोळे, सिध्देश्वर इंतुले,श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळ  अध्यक्ष  विपीन शिंदे, उपाध्यय  मडंळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, भोपे पुजारी  मंडळाचे सुधीर कदम, शशीकांत पाटील, विकास मलबा, जगदीश पाटील, नागेश सांळुके, किशोर गंगणे,प्रा.धनंजय लोंढे, संजय पेंदे, शांताराम पेंदे , कुमार इंगळे,  मंदीर समितीचे अभियंते भोसले सह  छञे पवेकर, पलंगे या सेवेदार   मंदीरचे कर्मचारी भक्त पुजारीवृंद अदि उपस्थितीत होते . राञी मांदीर प्रांगणात छबिना काढण्यात आला नंतर  प्रक्षाळपुजा होवुन शाकंभरी नवराञोत्सवाचा प्रथम दिनाच्या धार्मिक विधीची सांगता झाला.

 
Top