तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर येथील श्रीतुळजाभवानी मंदीर महाध्दार परिसर महाध्दार रोड भवानी रोड मंगळवार पेठ, मातंगीदेवी मंदीरा समोरील व घाटशिळ वाहन तळाकडे कुंभार गल्लीतुन जाणाऱ्या रस्त्यावर असणारे अतिक्रमणे नगरपरिषद ने  अतिक्रमण हटाव मोहीम प्रभावीपणे राबवुन सुमारे तीनशे ते साडेतीनशे कच्चे पक्के अतिक्रमणे हटवल्याने महाध्दार परिसर रोड,  मातंगी देवी मंदीर समोरिल कुंभार गल्लीतुन जाणाऱ्या रस्त्यांची ब-याच वर्षानंतर मोकळा श्वास घेतला 

  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांच्या आदेशाने प्रभारी  मुख्याधिकारी हरीकल्याण येलगटे यांनी पंधरा  पोलिसांच्या बंदोबस्तात नगरपरिषदच्या शंभर कर्मचाऱ्यांनी जेसीबी ट्रँक्टर वाहने माध्यमातून  अतिक्रमणे हटवले येथील परिसरांनी मोकळा श्वास घेतल्याचे पहावयास मिळत आहे. 

 
Top