तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूरनगरीत आदर्शवत विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला.विवाहपुर्वी जोडप्याने रक्तदान करूनच बोहल्यावर चढत आपल्या नव्या वैवाहीक जीवनास प्रारंभ केला. यावेळी उपस्थित वऱ्हाडी मंडळीतील ५७ नवदाम्पंत्यांनी रक्तदान केल्याने या विवाह सोहळा अदशर्वत ठरला असल्याचे चर्चेले जात होते. 

  कोरोनाचे सावट व सर्वञ रक्तांचा तुटवडा असल्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक डेकोरेशनचा व्यवसाय करणारे सुरेश बडोदकर यांनी आपल्या कन्येच्या विवाह सोहळ्यात रक्तदान शिबीर ठेवण्याचा माणुसकी जोपासणारा निर्णय घेवुन लग्न सोहळ्यत रक्तदान शिबीर ठेवुन तो प्रत्यक्षात अंमलात आणला. प्रथमता याचे उद्घाटन नवविवाहीत नवदांम्पत्यांनी रक्तदान करुन करताच उपस्थितीत व-हाडी मंडळी ही रक्तदान करु लागले काही तासात ५७ व-हाडी मंडळीनी रक्तदान केले.

   यावेळी बाळासाहेब धाकतोडे व सौ उषा धाकतोडे, मुकुंद शिंदे व सौ .सविता शिंदे ,प्रमोद चौधरी तेजस्विनी चौधरी ,महेंद्र कावरे कावरे व  स्वाती कावरे वधूचे पिता सुरेश कावरे (बडोदकर),  सौ. नीता कावरे, नवनाथ आलमले,सौ.वैशाली आलमले, जिल्हा परिषद शाळा तिर्थ (खुर्द) च्या मुख्याध्यापिका  सौ.अंजली कावरे ,   सोमनाथ टेकाळे, डॉ. पवन पाटील व  अन्य रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

   हे शिबीर यशस्वीतेसाठी सुरेश बडोदकर, युवास्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा डॉ. हेडगेवार, रक्तपेढी सोलापूरचे संचालक  महेंद्र कावरे, संस्थेचे सदस्य प्रमोद चौधरी, श्रीकांत कावरे, ओम कावरे यांनी परिश्रम घेतले.

 

 
Top