परंडा / प्रतिनिधी :-

कोरोनाचा प्रादुर्भाव काही अंशी कमी झाला आणि लालपरि रस्त्यावर धावू लागली त्यातच प्रवाशांची होणारी गैरसोय कमी होऊ लागली तेवढ्यातच एस टी कर्मचार्यांनी आपल्या मागण्या साठी संप पुकारला सर्व सामान्यची पुन्हा गैरसोय सुरू झाली. गेली दोन पावणे दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या संपामुळे सर्व सामान्यची मोठी परवडत होत आहे.परिणामी प्रवाशांना खाजगी वहानाचा अधार घेऊन प्रवास करावा लागत आहे.एकीकडे शासन व दुसरीकडे आपल्या मागण्या वर ठाम असलेले एस टी कर्मचारी या दोहोंच्या मध्ये मात्र सर्व सामान्य नागरिक भरडला जातोय.परंतू ना शासन ना एसटी कर्मचारी यांना सर्व सामान्यची होणाऱ्या लुटीचे सोयरसुतक नसल्याचे दिसते.

     परिसरातील बऱ्या पैकी लोक पुणे, मुंबई आदी ठिकाणी आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी वास्तव्यास आहेत.त्यांचे व त्यांच्या नातेवाईकांचे कुठल्याना कुठल्या कामा निमित्त ये जा सुरु असते .बस सुरू नसल्याने खाजगी बसेस व जिप गाड्यांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहे.सदरील खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बस व जिप गाड्या दामदुप्पट भाडे आकारत असल्याने सर्व सामान्यची मोठी आर्थिक लुट होत आहे.सबंधीतावर कुठल्याही यंत्रणे नियंत्रण नसल्याचे प्रवाशांकडून बोलले जात आहे.परिणामी एकतर कोरोनाच्या संकटातून सावरतो न सावरतो तोच प्रवासासाठी लुट होत असल्याने सर्व सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे.

  परंडा ते पुणे पुर्वी तिनसे रुपये आकार होता तो आत सहासे केला आहे.शेळगाव ते पुणे पुर्वी दोनसे पन्नास रुपये होते ते अता पाचसे रुपये केला आहे.सबंधीत यंत्रणेने लक्ष घालून प्रवाशांची होणारी आर्थिक लुट थांबवण्याची मागणी प्रवाशातून जोर धरू लागली आहे.एसटी बस बंद चार उद्योग धंद्यावर व आठवडी बाजारावर मोठा परिणाम.सर्व सामान्यांन खाजगी वहानाची तासनतास वाट पाहावी लागते.ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कामासाठी तालुक्याला जाने झाले आवघड.खेडयातील मुलांना बस नसल्याने शाळेत चार पाच किलोमीटर चालत जावे लागते.तर याला जबाबदार कोण असा प्रश्न जनतेतुन निर्माण झाला आहे.


 
Top