उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेस-भाजपच्या शेतकरी विकास पॅनलने सर्व १२ जागांवर विजय मिळवला आहे. सेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचा पराभव झाला. एक उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या अगोदरच अविरोध निवडून आला होता.

१२ जागांसाठी काँग्रेस-भाजप व सेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ उमेदवारांसह एक अपक्ष रिंगणात उतरले होते. रविवारी (दि.२) मतदान घेण्यात आले. १५१६ पैकी ६६५ मतदान झाले. यात काँग्रेस-भाजपच्या शेतकरी विकास पॅनलचे सर्व १२ जागा पटकावत सोसायटीवर सत्ता मिळवली.

पाच गावांतील मतदारांचा कौल

१२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तुळजापूर, क्राक्रंबा, काक्रंबावाडी, मोर्डा, तडवळा या पाच गावातील १५१६ सभासदांपैकी ६६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राजेंद्र शेंडगे, शहाजी देवगुंडे, पुष्पांजली बेडगे, अभिमन्यू मस्के, पद्मराज गडदे, चणाप्पा वट्टे, अरविंद वाघमारे, दशरथ कोळेकर, गणेश कोळेकर, शिवाजी हांडे, प्रतिभा हांडे, अरुण घोगरे हे उमेदवार विजयी झाले. फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. यावेळी अॅड. नागनाथ कानडे, जिल्हा परिषद सदस्य बालाजी बंडगर, मोहन घोगरे, उमेश क्षीरसागर, हरिदास वट्टे, व्यंकट झाडे, अशोक कंदले, शेतकरी सभासद, पदधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top