उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसादिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने एक दिवस राष्ट्रवादीसाठी.. एक नवीन उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. हा उपक्रम नवीन वर्षापासून प्रारंभ करुन तो प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी राबविण्यात यावा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केला होता. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी प्रथम या उपक्रमास सुरुवात केली आहे. दुधगाव या त्यांच्या गावी त्यांनी सरपंच शामसुंदर त्र्यंबकराव पाटील यांचे राष्ट्रवादी पक्षाचा सदस्य फार्म भरुन घेवून सुरवात करुन गावकर्‍यांशी संवाद साधला आहे.

एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी, प्रभावी-प्रगल्भ तरुण पुरोगामी विचारांसाठी या उपक्रमाबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खा. पवार यांच्या वाढदिवसादिवशी कार्यकर्त्यांना माहिती दिली होती. राष्ट्रवादी विचारांच्या कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचा यातून प्रयत्न असल्याचे जयंत पाटील सांगितले होते. त्यानुसार नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी (दि.1) उस्मानाबाद तालुक्यातील दुधगाव येथे संजय पाटील दुधगावकर यांनी उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपक्रमाची जिल्ह्यात प्रथम सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी दुधगाव या त्यांच्या गावी सरपंच श्री दुधगावकर यांचा राष्ट्रवादी पक्षाचा सदस्य फार्म भरुन घेतला. त्यानंतर कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत बैठक घेवून वैचारिक देवाणघेवाण केली. या उपक्रमाच्या माध्यमातून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शिस्त रुजली पाहिजे यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले. खा. पवार यांच्या विचारांची वैचारिक शिदोरी आपल्याकडे आहे. ती शिदोरी महाराष्ट्रातील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यासाठी एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे दुधगावकर यांनी सांगितले.


 
Top