तुळजापुर / प्रतिनिधी-

 तुळजापूर  शांकभरी  नवरात्रोत्सवातील सातव्या माळेदिनी रविवार दि.१६रोजी   देविंजींच्या सिंहासनावर महिषासुरमर्दिनी अलंकार महापुजा मांडण्यात आली होती.शाकंभरी नवराञोत्सवात आलेल्या रविवारी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. 

महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा आख्यायिका- त्वरीता  देवी म्हणजेच तुळजाभवानी ने अनुभूतीच्या रक्षणासाठी कुकर राक्षसाचा वध केला . हे युद्ध नऊ दिवस चालले . याप्रीत्यर्थ देवीजीचा सिंहासनावर महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते आज मंदीरात होम हवन संपन्न विधी यजमान सौ व श्री मंजुषा प्रविण कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. नंतर  शाकंभरी देविची मंगल आरती करण्यात आली हा विधी उपाध्य  बंडु सह त्यांच्या सहकारीबृम्हवृदांनी संपन्न केला. 

 
Top