तुळजापूर / प्रतिनिधी-

 श्रीतुळजाभवानी भवानी मातेच्या शाकंभरी नवराञोत्सवातील सातव्या माळेदिनी रविवार दि.१६  रोजी मंदीरातील श्रीगणेश ओवरीत  शाकंभरी देविसमोर  यजमान प्रविण कदम त्यांची पत्नी  मंजुषा कदम यांच्या हस्ते   हवन विधी पारंपारिक पध्दतीने संपन्न झाला.

प्रथमता संकल्प सोडण्यात आल्यानंतर पुण्याह वाचन करण्यात येऊन अग्नीमंथन, अग्नीस्थापना , देवतास्थपना सगळ्या देवता हवन  सप्तशती नवग्रह हवन हा धार्मिक विधी मंञोपचाराच्या गजरात संपन्न झाला.  या पुजेचे पौराहित्य उपाध्य बंडु पाठकसह बृम्हवृदांनी केले.


 
Top