उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) विरोधी आंदोलन याबाबत जनतेने आवाज उठवावा, अशी भावना युवा मोर्चा जिल्हा प्रभारी अमोल निडवदे यांच्यासह अनेकांनी युवा मोर्चाच्या बैठकीत व्यक्त केल्या.

 उस्मानाबाद येथील युवा मोर्चा बैठकीत संघटन मजबुत करणे, युवा वोरीयर्स शाखा स्थापन करणे या अनुषंगाने युवा मोर्चाची आगामी काळातील भूमिका युवा मोर्चा जिल्हा प्रभारी अमोल निदवडे यांनी मांडली. यावेळी बैठकीस उपस्थित भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, राजसिंहा राजेनिंबाळकर, बस्वराज रोडगे, नितीन भोसले आदींची उपस्थिती होती. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी मागील काही महिन्यातील स्थानिक तसेच प्रदेशाचे कार्यक्रम कार्याचा अहवाल दिला. यामध्ये जिल्ह्यात राबवले गेलेले उपक्रम, आंदोलने, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या काळात युवा मोर्चा आणखी आक्रमकपणे सहभागी राहील व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकित जास्तीत जास्त जागा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना उपलब्ध करून देऊ असे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी अश्वस्त केले. सोबतच जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी पक्ष वाढवण्यासाठी युवकांनी जास्तीत जास्त प्रयत्नशील, प्रवास करावा, लोकांच्या सहवासात सारखे राहावे असे सांगितले. या बैठकीत सुरज शेरकर, अजित काकडे, स्वप्नील नाईकवाडी, सुजित साळुंके, गणेश भोगील यांना युवा मोर्चा पदाधिकारी म्हणून निवडी करण्यात आल्या. तर विकास कुलकर्णी, अभय इंगळे, राहुल काकडे, मकरंद पाटील, प्रवीण पाठक, पांडुरंग पवार, पूजा देडे, देवकन्या गाडे यांच्यासह  युवा मोर्चा जिल्हा, तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top