उस्मानाबाद /प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्हयात पहिली शाखा उघडणारे कट्टर शिवसैनिक दत्ता भाऊ वराडे यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते.या घटनेची दखल  घेत  उस्मानाबादचे खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर,धाराशिव-कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास दादा पाटील, नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी वराडेजीच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले तसेच आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या दोन्ही मुलांच्या नौकरीची व व्यवसाय करणेसाठी पुरेपूर  मदत करण्याची व भविष्यात देखील कोणत्याही अडचणी आल्यास आपण खंबीरपणे उभा राहण्याची ग्वाही दिली व  वराडे कुटुंबाची जबाबदारी धाराशिव शिवसेनेच्या वतीने घेण्यात आली.यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुरज साळुंके,पंकज पाटील व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top