उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टीच्या वतीने गेल्या पंधरवाडयापासुन प्रभाग निहाय बैठकांचे आयोजन सुरु असुन आता पर्यंत ११ प्रभागामध्ये बैठका संपन्न झाल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते तथा तुळजापुर विधानसभा आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्तवात या सर्व बैठका संपन्न होत असुन आतापर्यंत या पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी केलेली विकासकामे व प्रभागमध्ये असणाऱ्या समस्यांचा आढावा या बैठकामध्ये घेण्यात येत आहे. जेणेकरुन येणाऱ्या काळात उस्मानाबाद शहरातील सर्व अडचणी सोडवत स्वच्छ आणि सुंदर उस्मानाबाद निर्माण करण्यासाठी उस्मानाबाद शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी या सर्व बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.

शहरात आतापर्यंत झालेल्या बैठकांप्रमाणे काल प्रभाग क्रं.४ येथेही म्हणजे माजी नगराध्यक्ष यांच्या प्रभागात बैठक घेण्यात आली, परंतू शहरातील इतर प्रभागांपेक्षाही प्रभाग क्रं.४ मधील परिस्थिती विदारक असल्याचे दिसुन आले. स्थानिक नागरिकांनी रस्ते, नाली, लाईट यासह असंख्य समस्यांचा पाढाच वाचण्यास सुरुवात केली. प्रभागात असलेल्या राधाकृष्ण मंदिरा जवळ असलेले घनवन असुन, सुसाट जणावरांसह प्रेमीयुगलांसाठी हे घनवन राखीव असल्याचे सांगत यावेळी संताप व्यक्त केला.

या बैठकीस सुनिल काकडे,संदिप इंगळे, अभय इंगळे, प्रविण सिरसाठे, ओम नाईकवाडी, गणेश मोरे,  सुरज शेरकर, गणेश एडके, विशाल पाटील यांच्यासह प्रभाग क्र 4 मधील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top