उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत एफसीआय मार्फत उस्मानाबाद जिल्हयात दि. 20 डिसेंबर-2021 पासून एनईएमएल पोर्टलवर तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. दि.01 जानेवारी 2022 पासून खरेदीस सुरुवात करण्यात आली आहे.

   राज्य शासनाने शेतातील पीक पेरा नोंदणी हे ऑनलाईन अॅपवर करण्याबाबत आदेशित केले आहे. परंतु काही शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली नाही. त्यामुळे राज्य शासनाने ऑनलाईन पीक पेरा नोंदणी करण्याकरिता 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन पीक पेरा नोंदणी करुन हमी भाव योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.

  

 
Top