उस्मानाबाद / राजा वैद्य -

जिल्हयात वाशी व लोहारा या दोन नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये वाशीमध्ये भाजपला १० , सेना ७ तर राष्ट्रवादी  व काँग्रेस प्रत्येकी शून्य-शून्य या प्रमाणे निकाल लागला. तर लोहारा नगर पंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना ९, राष्ट्रवादी काँग्रेस २, काँग्रेस ४ व दोन अपक्ष या प्रमाणे निकाल लागला आहे. या दोन्ही नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र समोर आले आहे. 

उस्मानाबाद जिल्हयात वाशी व लोहारा येथे नगरपंचायत आहेत. वाशी येथील नगर पंचायत निवडणुक भाजपने स्वबळावर लढवली तर शिवसेना-राष्ट्रवादी -काँग्रेस यंानी पण स्वतंत्र लढवली. या नगरपंचायत निवडणुकीमध्ये अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अस्तित्व नाममात्रच पहायला मिळाले.वाशी नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यंानी मेहनत घेतली तर शिवसेनेसाठी आमदार तानाजी सावंत यांनी काम केले. तर राष्ट्रवादीसाठी मंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार राहुल मोटे यांनी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबीनेटमंत्री येऊन देखील व तीन आमदारकीचा कार्यकाळ पुर्ण केलेले राहुल मोटे  यांना मतदारांनी धुडकावले आहे. तर शिवशक्ती साखर कारखाना चालु करून भूम-वाशी-परंडा तालुक्यात आपले वर्चस्व निर्माण करू पाहणारे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना केवळ ७ जागेवर समाधान मानावे लागले. शिवसेनेच्या ताब्यातील ही नगर पंचायत भाजपने आक्षरशा हिसकावून घेतली आहे. लोहारा नगर पंचायतमध्ये महाविकास आघाडीमधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र निवडणुक लढवली आहे. तर पुर्वी प्रमाणेच काँग्रेसला या ही निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दोन घटकांनी एकटे पाडले होते. शिवसेनेच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसने आपली लाज राखली असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्र लढून देखील काँग्रेसने चार जागेवर विजय मिळवला आहे. तर अपक्ष दोन निवडून आले आहे. 

 
Top