लोहारा/प्रतिनिधी

 लोहारा नगरपंचायत पंचवार्षीक निवडणूकीत बुधवारी १९ जानेवारी रोजी झालेल्या मतमोजणीत. शिवसेना राष्ट्रवादी आघाडीने शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, युवा नेते किरण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा धुव्वा करीत १७ जागा पैकी ११ जागावर दणदणीत विजय मिळवत नगरपंचायतवर सत्ता काबीज केली आहे. कॉग्रेसला केवळ ४ जागावर यश मिळाले आहे. तर २ जागावर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. लोहारा नगरपंचायतची पंचवार्षीक निवडणूक झाली. यात १७ जांगापैकी  १७ जागेसाठी ५८ उमेदवार निवडणूक रींगणात होते. या निवडणूकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिव राष्ट्र आघाडी विरुध्द काँग्रेस अशी दुरंगी लढत झाली. त्यात अपक्ष उमेदवारांनी प्रचारात वेग घेतल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. बुधवारी मतमोजणी झाली आणि चित्र स्पष्ट झाले. यामध्ये आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, युवा नेते किरण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला ९ तर  राष्ट्रवादी कॉग्रेसने २ जागेवर विजयी मिळवत १७ जागापैकी ११ जागा काबीज करत सत्ता ताब्यात घेतली आहे. कॉग्रेस ४ जागेवर व अपक्ष २ जागेवर विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारीच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत पेढे वाटत अनंद साजरा केला.

 
Top