वाशी  / प्रतिनिधी-

 नगर पंचायत समितीच्या सन २०२ १ - २०२२च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 17 जागेचा बुधवारी निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये सर्वात जास्त दहा जागेवर भाजपने विजय मिळवून शिवसेनेच्या ताब्यातील नगर पंचाय खेचून आनण्यात भाजपला यश आले आहे . तर शिवसेनेला केवळ सात जागेवर समाधान मानावे लागले आहे .

  बुधवार  दि - १९  जानेवारी रोजी वाशी तहसील कार्यालयाच्या आवारात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कंळबच्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाटाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस बंदोबस्तात सकाळी ठीक १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली . त्यामध्ये  भाजपला १० जागा मिळाल्या तर सताधारी शिवसेनेला केवळ ७ जागा मिळाल्या आहेत . तर  राष्ट्रवादी , इंदरा काँग्रेस व वंचितला या निवडणूकीत एकापण जागेवर विजय मिळवता आला नाही .

भाजपचे पॅनल प्रमुख  सुरेश कवडे याना प्रभाग क्रमाक ९ मधून विजय मिळवला आहे . प्रभाग क्रमाक १ मधून स्मिता अमोल गायकवाड , प्रभाग क्रमाक २ मधून वंदना सुहास कवडे , प्रभाग क्रमाक ३ - श्रीकृष्ण लहू कवडे , प्रभाग क्रमाक ४ - विजया गायकवाड , प्रभाग क्रमाक ६ - विकास पवार , प्रभाग क्रमाक १ २ - संजना चौधरी , प्रभाग क्रमांक १५ - वनमाला शिवाजीराव उंदरे , प्रभाग क्रमाक १६ - बळवत कवडे , प्रभाग क्रमांक १७ मधून भागवत कवडे हे विजयी झाले आहेत .

तसेच शिवसेनेचे एकूण सात विजयी उमेदवार प्रभाग क्रमाक - ५ दिग्विजय प्रशांत चेडे , प्रभाग क्रमाक ७ - रोहिणी किशोर भांडवले , प्रभाग क्रमांक ८ अलका सिद्धेश्वर भालेकर , प्रभाक क्रमांक १० नागनाथ नाईकवाडी , प्रभाग क्रमांक ११ शिवहारी स्वामी , प्रभाग क्रमाक १३ शामल दत्ताञय कवडे , व प्रभाग क्रमाक १ ४ मधून वर्षा विकास मोळवणे याणी विजय मिळवला आहे 

निकाल घोषित होताच तहसील कार्यालयाच्या आवारात विजय उमेदराच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण फटाक्‍यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला .  मतमोजणी वेळी निवडणूक अधिकारी म्हणून कंळबच्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडली . त्यांना तहसीलदार नरसिंग जाधव व नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी गिरीश पंडित यानी त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून त्यांना मतमोजनी वेळी मदत केली .


 
Top