उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 वेळ अमावास्यानिमित्त   रविवारी दि. २ जानेवारी रोजी   उस्मानाबाद जिल्ह्यातील शेत शिवारात नागरिकांची मोठी गर्दी होती. शेतकरी कुटुंबिय मोठ्या उत्साहात शेतातील पाच पांडवाची विधिवत पुजा करून अन्नधान्य  जास्त उत्पन्न मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

दरम्यान मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. नैसर्गिक संकट कितीही आले तरी काळ्या आईची  पुजा करण्याच्या परंपरेत शेतकऱ्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. नवीन वर्षातला पहिल्या रविवारचा योग वेळ अमावस्येला आल्याने शेतकरी कुटुंबियात मोठा उत्साह दिसतोय. भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे.  हजारो कुटुंबाचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेती कसणारा वर्गही मोठा आहे. शेतीला ‘धनलक्ष्मी’ मानणारा शेतकरी बांधव शेतातील उत्पन्नाची समृद्धी व भरभराटी होण्याची मनोकामना व्यक्त करत  काळ्याआईची मनोभावे विधीवत पुजा करून  वेळ अमावस्या साजरा करतो. बहुतांश नागरिकांचा रविवारचा दिवस शेत शिवारात गेला. 

यावेळी शेतामध्ये पाच पाडवांना नैद्य दाखविल्यानंतर अंबिल, भंज्जी, उंडे, बाजरीची भाकरी, वरण, वाग्याची रस्सा भांजी, पातीची भाजी,खिर, दुध, तुप आदी पदार्था भोजन केले जाते. 

 
Top