उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 माजी सामाजिक कॅबिनेट मंत्री तथा   भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे साहेब उस्मानाबाद येथे आले असता त्यांना फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

 या निवेदनात असे म्हटले आहे की, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील जिल्हा परिषद यांच्या अधिनस्त असलेली जागा ही फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीला मिळावी. महामानवाला अभिवादन करताना जागा अपुरी पडत असल्याने व भररस्त्यात कार्यक्रम होत असताना अपघात होण्याची शक्यता आहे आणि यापूर्वी देखील अपघात झालेले आहेत.या जागेसंदर्भात अनेक वर्षापासून मागणी असता दि. 21 जानेवारी 2019 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंढे मॅडम यांनी बैठक घेतली व तात्पुरत्या स्वरूपात ही जागा कार्यक्रम घेण्यासाठी समितीला देण्यात आली व समितीच्या नियोजित बाबींची पूर्तता करण्यासाठी ही जागा नगर परिषद उस्मानाबाद यांच्याकडे हस्तांतरण करण्यासाठी त्यांना सांगितले परंतु जिल्हा परिषद यांनी अद्यापपर्यंत कसलीही हालचाल केली नाही. नियोजित बाबी पूर्ण करण्या करिता जिल्हा परिषद असमर्थता दाखवत आहे या समितीच्या माध्यमातून ग्रंथालय,वाचनालय, अभ्यासिका,संविधान भवन, बगीचा, सांस्कृतिक सभागृह अन्य बाबीचे नियोजन केले असून जर ह्या बाबी पूर्ण झाल्या तर सर्व समाज बांधवांसाठी अतिशय उपयोगी राहणार आहे. ही संपूर्ण जागा समितीकडे हस्तांतरण करावी यासाठी आपण सहकार्य करावे असे लेखी निवेदन माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे साहेब यांना देण्यात आले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सदर जागेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे साहेब,कुमार कुर्तडीकर,नगरसेवक तथा डिपीडीसी सदस्य सिद्धार्थ बनसोडे नगरसेवक राणा बनसोडे,बारा बलुतेदार संघटनेचे धनंजय शिंगाडे, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मेसा जानराव, स्वप्निल शिंगाडे,श्री.घरबुडवे,समितीचे धनंजय वाघमारे,गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने,स्वराज जानराव,अतुल लष्करे, सोमनाथ गायकवाड,सचीन सरवदे,ज्योतीताई बडे,सुधाकर माळाळे इतर अन्य उपस्थित होते

 
Top