तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील आरळीखुर्द गावात अवैध दारुविक्री वाढल्यामुळे गावातील तरुण वर्ग व्यसनाधीन होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतने गावात दारुबंदी ठराव घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत व तंटामुक्त समिती यांनी पोलिस स्टेशनला निवेदन दिले.

आरळीखुर्द (ता. तुळजापूर) या छोट्याशा गावात झोपडपट्टी, पारवेवस्ती, चिंचोली रोड येथे अवैध दारु विकली जाते. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतची सभा घेवुन गावात दारुबंदी करण्याचा ठराव सारीका पारवे यांनी मांडला त्याला वैशाली मोटे यांनी अनुमोदन दिले.

तसेच महात्मा गांधी तंटामुक्त समितीने तर दारु विक्रेत्यांची यादीच नळदुर्ग पोलिस स्टेशनच्या फौजदारला देवुन यांच्या वर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली तसेच दारुबंदी करावी, यामागणीचे निवेदन पोलिस स्टेशन नळदुर्गला सरपंच पल्लवी गायकवाड, सरिता पारवे , मिना मोहीते, वैशाली मोटे यांनी दिले.

 
Top