उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखानाबाबत डीआरटी कोर्टाने (कर्ज वसुली न्यायाधिकरण ) महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याची निविदा प्रक्रिया रद्द ठरविली आहे तसेच निविदा प्रक्रिया पुन्हा राबविण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे तेरणा कारखाना निविदा प्रकरणी जिल्हा बँक व भैरवनाथ उद्योग समूहाला मोठा झटका बसला आहे.

तेरणा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निविदा प्रक्रियाचा वाद ट्वेंटीवन शुगरने डीआरटी कोर्टात (कर्ज वसुली न्यायाधिकरण) दाखल केला होता त्यावर हा निर्णय देण्यात आला आहे. 31 जानेवारी 2022 पर्यंत डीआरटी कोर्टातील भैरवनाथ शुगर व ट्वेंटीवन शुगर फॅक्टरी यांच्यातील प्रकरण निकाली लावावे असा आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गंगापूरवाले यांनी दिले होते.उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तेरणा कारखाना शिवसेना आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ उद्योगसमूहला 25 वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता मिळाली होती मात्र आता ही प्रक्रिया डीएआरटी कोर्टाने रद्द केली आहे.

निर्णय लवकर घ्या-अॅड. खोत 

तेरणा कारखाना संघर्ष समितीचे अॅड. अजित खोत यांनी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपत आली आहे. त्यामुळे प्रशासक किंवा या मंडळाच्या विशेष बाब म्हणून तेरणा कारखान्याची  फेर निविदा प्रक्रिया तत्काळ करावी, अशी मागणी केली आहे.  या कारखान्यावर लाखों लोकांचे संसार अवलंबून आहेत. अशी प्रतिक्रिया दिली.


 
Top