तुळजापूर / प्रतिनिधी- 

 श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी  नवरात्र महोत्सवातील  सहाव्या  माळेदिनी शनिवार  दि१.५रोजी  देविजींचा चांदीचा सिंहासनावर  ‘ भवानी तलवार  अलंकार महापुजा  मांडण्यात आली होती.

 .या अलंकार महापुजा बाबतीत अधिक माहीती अशी की, हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना  संकटकाळी  भवानी मातेने प्रगट होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार भेट देऊन अन्यायी व निर्ढावलेली राजेशाही नष्ट करून स्वराज्य निर्माण करण्यासाठी आशीर्वाद  छत्रपती शिवरायांना  दिल्याचे मानले जाते . याच निमित्ताने सदरील भवानी अलंकार महापूजा या ऐतिहासिक क्षणाच्या अनुषंगाने मांडण्यात येते . अतिप्राचिन देवस्थानात एखाद्या राजाला थेट सिंहासनावर मुर्तीरुपात अधिष्ठान मिळणे हा योग दुर्मिळच असून , यातूनच शिवाजी महाराज व भवानी माता यांच्यातील दृढ नाते स्पष्ट करते .


            


 
Top