तेर / प्रतिनिधी

 उस्मानाबाद तालुक्यातील जि.प. प्रा.शा. अंबेहोळ येथे कार्यरत असलेल्या  मनिषा मधूकरराव ओव्होळ यांना जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, वौजापूर जि. औरंगाबादच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2022   कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर सभापती संजय निकम व  उपविभागीय पोलीस अधिकारी  कैलास प्रजापती  यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

पंचायत समिती कार्यालय वौजापूर येथे झालेल्या  कार्यक्रमात मनिषा ओव्होळ  यांच्या शौक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. ओव्होळ  यांनी वक्तृत्व, निबंध, गीत, गायन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपले कार्य विविध शाळेत पार पाडलेले आहे.    या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्तीबद्दल ओव्होळ  यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.


 
Top