उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदग्रहण समारंभात संघटनेचे प्रशासक दिनेश दुपारे यांनी संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष धनाजी आनंदे व सचिव किरण हंगरगेकर यांच्याकडे पदभार सोपवला. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

लातूरच्या धर्मादाय आयुक्तांनी संघटनेची दुबार निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. कोरोनामुळे संघटनेची निवडणूक लांबली होती. गेल्या ३१ ऑक्टोबरला न्यास नोंदणी विभागाच्या निरीक्षणात झालेल्या निवडणुकीत आनंदे गटाने बाजी मारली. यामुळे लातूर धर्मादाय आयुक्तांमार्फत दिनेश दुपारे यांनी संघटनेचा कारभार पुन्हा एकदा कायदेशीर मार्गाने धनाजी आनंदे गटाकडे सोपवला. संघटनेत सचिव म्हणून किरण हंगरगेकर, उपाध्यक्ष राजेश्वर मुदकण्णा, सहसचिव सतीश गंभीरे, तर कोषाध्यक्ष म्हणून कुणाल गांधी निवडून आले. त्यांनाही सूत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी उस्मानाबाद तालुकाध्यक्ष रोहित फिसरेकर, कळंब तालुकाध्यक्ष प्रमोद पोते, उमरगा-आनंद बरमदे, तुळजापूर सचिन शिंदे, लोहारा प्रमोद बंगले, परंडा विकास जगदाळे, भूम राजाभाऊ हराळ तर वाशी तालुकाध्यक्ष सचिन पवार यावेळी उपस्थित होते.

स्वीकृत सदस्यपदी जिल्हा प्रतिनिधी म्हणून अविनाश बिराजदार, उस्मानाबाद तालुका प्रतिनिधी दिनेश वाबळे, कळंब शिवप्रसाद भडंगे, वाशी तालुका प्रतिनिधी सचिन कवडे, तुळजापूर बाबासाहेब कदम, लोहारा भरत सुतार, भूम प्रदीप गायकवाड, परंडा सय्यदअली युसूफ यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या.

गटाकडे सोपवला. संघटनेत सचिव म्हणून किरण हंगरगेकर, उपाध्यक्ष राजेश्वर मुदकण्णा, सहसचिव सतीश गंभीरे, तर कोषाध्यक्ष म्हणून कुणाल गांधी निवडून आले. त्यांनाही सूत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी उस्मानाबाद तालुकाध्यक्ष रोहित फिसरेकर, कळंब तालुकाध्यक्ष प्रमोद पोते, उमरगा-आनंद बरमदे, तुळजापूर सचिन शिंदे, लोहारा प्रमोद बंगले, परंडा विकास जगदाळे, भूम राजाभाऊ हराळ तर वाशी तालुकाध्यक्ष सचिन पवार यावेळी उपस्थित होते.

 
Top