तुळजापूर / प्रतिनिधी-
महाराष्ट्राला कोरोना संकटातुन मुक्ती दे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची प्रकृती चांगली होवु दे, असे साकडे घालुन एसटी कामगारांनो कामावर या ग्रामीण भागातील जनता वेठीस धरु नका ,असे आवाहन परिवाहनमंञी अनिल परब यांनी श्रीतुळजाभवानी दर्शना नंतर पञकारांशी बोलताना केले.
सोलापूरहुन तुळजापूरला आगमन होताच थेट श्रीतुळजाभवानी मंदीरात जावुन मंत्री परब यांनी देवीदर्शन घेतले. त्यानंतर श्रीतुळजाभवानी संस्थान वतीने विश्वस्त तथा उपविभागीयअधिकारी योगेश खरमाटे यांनी मंञी परब यांना देविची प्रतिमा देवुन सत्कार केला.यावेळी उपनेते अनिल खोचरे जिल्हाध्यक्ष आ. कैलास पाटील, तहसिलदार सौदागर तांदळे, धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे सह पदाधिकारी उपस्थितीत होते.
यावेळी पञकारांशी बोलताना परब म्हणाले की, एसटी संपामुळे एसटीचे व कामगारांचे न भरुन निघणारे नुकसान होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर निर्णय हायकोर्ट समिती घेणार आहे , त्यामुळे जनतेचे हाल होवु नये म्हणून आम्ही सेवानिवृत्तांची भरती करुन वाहतूक व्यवस्था सुरुळीत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. निलंबीत कामगारांन वरील कारवाई मागे घेणार नाही हा संपच बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले.
कामगारांनी आत्मदहन मार्ग स्विकारु नये यात त्यांचे कुंटुंब उघड्यावर पडुन नुकसान होणार आहे लक्षात घ्यावे, असे आवाहन केले. भाजपा आयटी विभागाचा ट्िवट बाबतीत बोलताना परब म्हणाले की, महिला बाबतीत कुणीही आक्षपार्ह वक्तव्य करु नये.रिसोर्ट प्रकरणी बोलताना परब म्हणाले या रिसोर्टशी माझा काहीही संबध नाही हे चौकशीतुन स्पष्ट झाल्याचे सांगितले .