उस्मानाबाद / प्रतिनिधी- तेरणा साखर कारखाना प्रशालेत आयोजित तेरणा व तडवळे बीटमार्फत बालविवाह निर्मूलन प्रशिक्षण वर्गात ढोकी परिसरातील पत्रकारांचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व दर्पण दिनानिमित गुरुवार दि. 6 रोजी सत्कार संपन्न झाला.

3 डिसेंबर ते 12 डिसेंबर या सावित्रीबाई फुले ,जिजाऊ जन्मोत्सव सप्ताहानिमित्त सावित्रीबाई फुले व जिजाऊ माता यांच्या प्रतिमेचे पूजन तेरणा नगर बीटच्या विस्तार अधिकारी श्रीमती किशोरी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले .यानंतर उपस्थित प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक यांच्या हस्ते दर्पण दिनानिमीत ढोकीतील सर्व पत्रकारांचा पुष्पहार व लेखणी भेट देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात विस्तार अधिकारी श्रीमती किशोरी जोशी यांनी तेरणा बीट व तडवळे बीट मध्ये आयोजित  शैक्षणिक उपक्रमाचा आढावा घेतला, विविध ठिकाणची शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढ, गुणवत्ता वाढ तसेच वाचन लेखनामध्ये संपूर्णपणे मागे असलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत या कामी परिसरातील पालकांची व पत्रकारांची आम्हालासहकार्याची अपेक्षा व्यक्त केली .या कार्यक्रमात  वाकरवाडी येथील शिक्षक दिनकर चव्हाण यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विविध शाळेचे मुख्याध्यापक ,मुख्याध्यापिका यांचा ही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या मुलींनी सावित्रीबाईंचा व जिजाऊंचा पोषाख घालून स्वागत गीत गाऊन उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.

या कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक पी.जी .वाकुरे, ग्रामपंचायत सदस्य शकील काजी, पत्रकार राजेंद्र पाटील, इम्रान शेख, सुरेश कदम ,बापू भुसारे ,अरुण देशमुख, संजय शिंदे, संतोष बाकले, जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक एस .एम. गायकवाड ,तेरणा प्रशालेचे मुख्याध्यापक संजय पाटील, तडवळा बीटचे प्रभारी केंद्र प्रमुख श्रीअनपट विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट व प्रभावी संचलन व आभार प्रदर्शन तेरणा बीटचे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख शिवाजी चव्हाण यांनी केले. तेरणा च्या विस्तार अधिकारी श्रीमती किशोरी जोशी व केंद्रप्रमुख शिवाजी चव्हाण यांनी या ठिकाणी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून उस्मानाबाद नव्हे तर पूर्ण मराठवाड्यात एक वेगळा पॅटर्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे उपस्थित पत्रकारानी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

 
Top