तेर / प्रतिनिधी-

 स्वयं शिक्षण प्रयोग उस्मानाबाद सखी युनिक रुरल  इंटरप्राईजेस व लक्ष्मी संकलन केंद्र यांच्यामार्फत तेर गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी तेर येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते.

 संस्थेच्या तालुका समन्वयक रोहिणी घोडके यांनी प्रथम संस्थेची ओळख व संस्थामध्ये चालणाऱ्या कार्यक्रमाविषयी व  बायोगॅस, सब्जी कुलर याबद्दल माहिती दिली तसेच संस्थेचे डॉ.रंगनाथ  वराळे यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांचे चारा व्यवस्थापन, जनावरांचे आरोग्य, दूध वाढीसाठी उपाय योजना, तसेच गोठा बांधणी व नियोजन याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी, लक्ष्मी दूध संकलन केंद्राच्या चेअरमन जयश्री माळी व पशुपालक उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या शाहिदा मुजावर व राणी शिराळ , रोहिणी घोडके,शाहिदा मुजावर , गोरख माळी यांनी परीश्रम घेतले.

 
Top