उमरगा / प्रतिनिधी-

शालेय विध्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रतिज्ञा बरोबरच पंचशिलाची शिकवण देण्यात यावी हे पाच शील कोणत्याही धर्माचे नाहीत तर प्रत्येक माणसाला जीवन जगताना आचरणात आणण्याची पद्धती आहे.  मी जीव हत्या करणार नाही,मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही,  मी खोटे बोलणार नाही,मी दारू पिणार नाही या प्रतिज्ञा माणसाच्या कल्याणसाठी आहेत.बुद्ध शिकवणीतील चार आर्य सत्य बौद्ध धम्माचा गाभा आहेत. धम्मात देव भोळे पणा नाही वं शाप वं वरदानही नाही आपले कुशल कर्मच आपल्या दुःख मुक्तीचा मार्ग मोकळा करून देते त्याकरीता प्रत्येकानी शुद्ध आचरण करून धम्म आत्मसात करावा असे प्रतिपादन भन्ते उपगुप्त महाथेरो ( पूर्णा ) यांनी केले.

दि लॉर्ड बुद्धा रिलीजीयस अँड चॅरीटेबल ट्रस्ट च्या वतीने कपिल वस्तू परिसरातील विहारात शुक्रवारी घेण्यात आलेल्या धम्मपरिषदेच्या उदघाट्न प्रसंगी बोलत होते. प्रारंभी पचशील ध्वजाचें ध्वजा रोहन त्याच्या हस्ते करण्यात आले आणि धम्म परीषदेचे उदघाट्न त्याच्या हस्ते करण्यात आले या वेळी उपस्थित उपासकाना ते संबोधित करीत होते

धम्मपिठावर भन्ते सुमेध नागसेन, भंते डी. धम्मसार, भंते सुमंगलं, ट्रस्ट चें अध्यक्ष विलास खिलारे, कैलास शिंदे, डी. टी. कांबळे. दिलीप भालेराव, जी. एस. साबळे, एम. एस. सरपे. अँड शीतल चव्हाण,संजय सरपे आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना भंते उपगुप्त म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकराणी आपणास महानं असा बौद्ध धम्म दिला आहे. त्या धम्माचें पवित्र्य राखणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. बाबासाहेबाणी धम्म दिक्षेचा सोहळा पुढे ढकलावा असे त्या काळच्या पुढाऱ्यांना वाटतं होते पण त्याचें म्हणणे नं ऐकता बाबाणी धर्मातर केले आणि आपण बौद्ध झालो धम्मदीक्षेच्या काही दिवसातच डॉ बाबासाहेबाचें महा परिणीर्वान झाले आणि त्यानी धम्म दिक्षा घेतली नसती तर आपण कोणत्या धर्मात राहिलो असतो म्हणून त्यानी दिलेल्या धम्माचीं हेळसांड नं करता प्रामाणिक धम्म आचरण करून आपली प्रगती साधावी असे ते म्हणाले.भगवान बुद्धाच्या शिकवणीचा उच्य दर्जाचा मार्ग आहे आर्य आष्टागिक मार्ग, दहा पारमिता आणि दस शिलाची शिकवण आत्मसात करून धम्म जिवन्त ठेकण्यासाठी आपण कार्य करावे आपले आचरण अंकुशल असले तर धम्माला गती येणार नाही आपण शुद्ध आचरण करून डॉ बाबासाहेब आंबेडकराचे धम्म चक्र गतिमान करावे असे आवाहन त्यानी केले.या वेळी खरोसा बुद्ध लेणी येथील भन्ते सुमेध नागसेन, डी धम्मसार यांचे धम्म प्रवचन झाले परिषदेचे प्रास्ताविक ट्रस्ट चें अध्यक्ष विलास खिल्लारे यांनी केले. सूत्रसंचालन धम्ममित्र जी. एल. कांबळे यांनी केले.या वेळी तालुका वं परिसरातील बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top