तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यातील वडगाव देव येथे कोविजन फाऊंडेशन यांच्या वतीने वडगाव देव गावातील गरजू आणि विधवा महिलांना मदतीचा हात या उद्देशाने शेळी वाटप तर पिरॅमल कंपनी यांच्या वतीने वडगाव येथे शुद्ध पाण्याचे आर.ओ.प्लँट चे उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव देवचे मुख्याध्यापक विजयकुमार जाधव,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुहास पवार,पिरॅमल कंपनीचे दीपक कळमकर,कोविजन फाऊंडेशनचे वाघमारे,सलगरा आरोग्य केंद्राचे डॉ.रेड्डी,वडगाव देवच्या पोलीस पाटील कल्पना मस्के,उमाकांत पाटील,सामाजिक कार्यकर्ते मनोज देवकते,सरपंच.पद्मिनी सगट,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष.शेषेराव गवळी,उपाध्यक्ष लिंगप्पा कोरे,माजी सरपंच नागेश कालेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top