उस्मानाबाद(प्रतिनिधी)

देशाचे भवितव्य तरूणावर आवलंबून असते आजच्या तरूणांची मने सुसंस्कारित असण्याची गरज आहे तरूणामध्ये उत्साह असायला हवा व नैतिकता असायला हवी यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचारांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात विवेकानंद व जिजाऊमाता यांच्या जयंती निमित्त मार्गदर्शन करताना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी १२ जानेवारी रोजी केले आहे.

प्रारंभी श्री विवेकानंद व जिजाऊमाता यांचे प्रतिमाचे पुजन त्यांनी केले.पुढे बोलताना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करतांना स्वामी विवेकानंद यांचे त्यागीमय जीवन व त्यांचे विचार तरूणात रूजविण्यासाठी शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांनी संस्थेला श्री विवेकानंद यांचे नाव दिले तर महाविद्यालयाला रामकृष्ण परमहंस यांचे नाव दिले त्यामुळे या महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी आदर्शच असायला हवा व येथील गुरेदेव कार्यकर्ते यांनी ज्ञानदान करतांना नैतिकतेचे धडे विद्यार्थ्यांना देण्याचे शेवटी आवाहन केले.

यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी,सेवक व निवडक विद्यार्थी कोरोनाच्या नियमाचे पालन करून उपस्थित होते.

यावेळी जिजाऊ माताचे कार्य या विषयावर राज्यशास्ञ विभागातील प्रा.स्वाती बैनवाड यांनी विचार व्यक्त केले.आभार प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर यांनी मानले.


 
Top