उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती शिवराज्याभिषेक सोहळा समिती,उस्मानाबादच्या वतीने   दि.12 जानेवारी 2022 रोजी साजरी करण्यात आली.यानुसार आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील मंचावरील जिजाऊ माँसाहेब व बाल शिवबा यांचे भव्य मुर्तीस जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.अस्मिताताई  कांबळे,डॉ. स्वातीताई लाकाळ,डॉ.वसुधाताई दापके,डॉ.पल्लवीताई दहिटणकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ.अस्मिताताई कांबळे म्हणाल्या” शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे कार्य अनुकरणीय आहे.समाजात समितीच्या कार्यकर्त्यां प्रमाणे सुजाण नागरीक निर्माण होण्याची गरज आहे.कोरोना काळात सर्व नागरिकांनी आपली काळजी घ्यावी.कोरोना प्रतिबंधक लस प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.जिजाऊ माँसाहेबांनी ज्याप्रमाणे शिवबांना घडविले त्याप्रमाणेच प्रत्येक माताभगिनींनी आपल्या पाल्यास घडवावे.यावेळी समितीचे अध्यक्ष श्री.शशिकांत खुने,उपाध्यक्ष श्री.धर्मराज सुर्यवंशी,सचिव श्री.दत्तात्रय साळुंके,कार्याध्यक्ष श्री.कंचेश्वर डोंगरे,डॉ. शतानंद दहिटणकर अमोल पवार,प्रसिद्धी प्रमुख श्री.अशोक गुरव, संतोष घोरपडे,रियाजशेख,मिडीया सेलचे श्री.दत्ता जावळे,मच्छिंद्र कांबळे,नितीन वीर,नाना डोंगरे,व्यंकट कोळी,ओमकार शितोळे,भगिरथ पाटिल,डाॅ.अमर सातपुते,डाॅ.सुजित काटकर,धनंजय साळुंके,अमर कोळी,आबासाहेब सुरवसे,शिवाजीराजे काकडे,सुदर्शन बुकन, महेबूब पठाण, रमाकांत वाघुले,संभाजी भातलवंडे,उमाकांत चित्राव,आकाश चौधरी,संजय कदम,राजाभाऊ सुर्यवंशी इ.सह बहुतांश सहकारी उपस्थित होते.तसेच शिवराज्याभिषेक सोहळा समिती महिला आघाडी प्रमुख सौ.शिलाताई जोशी,उपप्रमुख किरण गायकवाड, सचिव सौ.वर्षाताई आतकरे,सौ.रामेश्वरी खुने,सौ.रंजना साळुंके,स्नेहल कुलकर्णी, सविता गायकवाड, सौ.मंजूताई फंड, सौ.गितांजली वीर,सौ.मोहिनी गुरव,सुवर्णा कुलकर्णी,सौ.निपुलता काकडे,  नुतनी कुलकर्णी,सौ.धनश्रीताई साळुंके,सौ.मेघना बागल,सौ. यशस्विनी उंबरे,सौ.वनिता चव्हाण, सौ.प्रज्ञाताई सरवदे इ.महिला सदस्या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. शिलाताई जोशी यांनी केले.तर सूत्रसंचालन किरण गायकवाड यांनी केले.आभार प्रदर्शन  सौ.वर्षाताई आतकरे यांनी केले.


 
Top