उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा खेळाडू सुमेध चिलवंत याची अंतरविद्यापीठ तायक्वॉदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत तो डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

बीड येथे २८ डिसेंबर रोजी झालेल्या अंतर महाविद्यालयीन तायक्वॉदो स्पर्धेत सुमेधने ५८ किलो वजन गटातून चमकदार कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावल्याने त्याची ही निवड करण्यात आली. त्यास तायक्वॉदो संघटनेचे सचिव राजेश महाजन, राम दराडे, आकाश मोरे, शरिफ शेख यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्याचा जिल्हा तायक्वॉदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ओमप्रकाश झालटे, माधव महाजन, संकेत बनसोडे, रोहित पंचमहाल आदी उपस्थित होते.


 
Top