तुळजापूर / प्रतिनिधी

श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञोत्सवाचा प्रथम दिनी  रांजनगाव येथील देविभक्त    माऊलीशेठ नानासाहेब पाचुंदकर व पत्नी सौ. अर्चनाताई माऊलीशेठ पाचुंदकर यांनी   संपुर्ण मंदीर आकर्षक फुलांनी सजवले होते. 

  शाकंभरी नवरात्र महोत्सवात  घटस्थापनेच्या दिवशी श्रीदेवीजींचा गाभारा व बाहेरील परिसरात फुलांची अतिशय उत्कृष्ट सजावट केली आहे. या निमित्त्याने मंदिर संस्थान वतीने सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे यांनी श्री देवीची प्रतिमा व साडी फोटो श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी मंदिर अभियंता राजकुमार भोसले, अनिल चव्हाण, प्रवीण अमृतराव, लेखापाल सिद्धेश्वर इंन्तुले, विश्वास कदम, गणेश नाईकवाडी, संकेत वाघे, रवि गायकवाड व सुरक्षा रक्षक पुजारी राम छत्रे आदी उपस्थित होते

 
Top