तुळजापूर/प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका तुळजापूरच्या वतीने कॉलेज समोर काळे विधेयक मागे घेण्यासंदर्भात बॅंनर फडकावून निदर्शने करण्यात आले. 

 जिल्ह्याचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, संतोष बोबडे यांच्या सूचनेनुसार  कुलगुरूंचे अधिकार शिक्षण मंत्र्यांना देण्याचे विधेयक केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तुळजापूर च्या वतीने ५०० पोस्टकार्ड पोस्टाने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले तसेच शहरातील महाविद्यालयासमोर काळे विधेयक मागे घेण्यासंदर्भात बॅनर लावण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष आनंद कंदले, शहराध्यक्ष राजेश्वर कदम,विजय क्षिरसागर, सुदर्शन पांढरे, राहुल साठे, अभिजीत लोके, राम चोपदार,सचिन बागल, लक्ष्मण मुगुटराव,दयानंद शिंदे ,ऋषी साळुंके, निलेश नाईकवाडी, रत्नदीप लोंढे व सहकारी उपस्थित होते.

 
Top