तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील संत गोरोबाकाकाच्या पावन नगरीत अखंड हरिनाम सप्ताहास रविवार दिनांक २३ पासून भक्तीमय वातावरणात भाविकाच्या उपस्थितीत प्रारंभ झाला झाला.कोरोना या महामारीच्या तिसऱ्या लाटेसह शासनाने घातलेल्या विविध निर्बंधांमुळे तेर ता उस्मानाबाद येथील ग्रामस्थांच्या वतीने गेल्या सात वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेली परंपरा यावर्षी खंडित होऊ नये म्हणून कोरोनाचे निकष पाळीत मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे

दि. २३ ते ३० जानेवारी या कालावधीत आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला आहे. दररोज काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, गाथा पारायण, हरिपाठ , हरिकीर्तन आदि धार्मिक कार्यक्रम होतील. यावेळी या सप्ताहात तेरसह परिसरातील कीर्तनकाराची कीर्तनसेवा होणार असून यामध्ये ह.भ.प प्रशांत महाराज नांदे- वाणेवाडी , हभप महेश महाराज भोरे- तेर , हभप योगेश महाराज- दारफळ , हभप हर्षद महाराज दसवडकर- नांदेड , हभप माऊली महाराज अणसूर्डेकर , हभप महादेव महाराज बोराडे , हभप दत्तात्रय महाराज अंबीरकर डिकसळ, यांची कीर्तनसेवा होणार आहे तर दिनांक ३० रोजी ह.भ.प महादेव महाराज राऊत बीड यांची काल्याची कीर्तन सेवा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


 
Top