तुळजापूर / प्रतिनिधी-

 स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याची माहीती स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी दिली.

उस्मानाबाद जिल्हयात स्वाभिमानी शेतकरी संघटनने पिकविमा अनुदान अतिवृष्टी मदत तसेच ऊस सोयाबीन कांदा सह अन्य पिकांना दर मिळावा तसेच भूसंपादनाबाबतीत रस्त्यावर उतरुन आंदोलने केले असुन स्वाभिमानी शेतकरी संघटने बाबतीत जिल्हयात शेतकरी, कष्टकरी वर्गात सहानुभुती असुन हा मतदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठीशी उभा राहणार आहे,त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनने स्वबळावर या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

आगामी निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवारांचा प्रचारासाठी संस्थापक अध्यक्ष माजी खा. राजु शेट्टी, रविकांत तुपकर, गजानन बंगाळे पाटील, पुजाताई  मोरे, प्रशांत टिक्कर येणार आहेत ,अशी माहीती जिल्हाध्यक्ष रविंद्रइंगळे यांनी दिली. आगामी निवडणुक बाबतीत लवकरच स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा शाखेची बैठक होवुन यात उमेदवार बाबतीत चर्चा होणार आहे. त्यामुळे आगामी जिप.पंस नगरपरिषद निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लाभ कुणाला फटका कुणाला बसणार हे आगामी निवडणुक निकाला नंतर स्पष्ट होणार आहे.


 
Top