उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी ता. उस्मानाबाद येथे बालिका दिन उत्साहात साजरा  करण्यात आला. प्रारंभी महिलांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी   शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  विजयकुमार नांदे  व प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष  श्याम बापू लावंड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य  संजीवनी पौळ,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ. अफसाना सलीम शेख,बालाजी माळी,वैभव साळुंखे ,विठ्ठल वीर,शाहीन शेख,आयेशा शेख  व गावातील महिला तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेतील मुलींनी गीत सादर करून स्वागत केले.शाळेतील सर्व शिक्षीकांचा पुषपगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अफसाना सलीम शेख यांनी शाळेसाठी 5000 रू रोख रक्कम  देणगी देऊन मदत केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  देशमुख अनिता व आभार  शिक्षिका श्रीमती वर्षा डोंगरे यांनी मानले. शाळेतील सर्व विदयार्थ्यांना श्रीमती अनिता  देशमुख यांच्या वतीने अल्पोपहार वाटप करण्यात आला ,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  कराड एस एन,   मते के डी , श  ढगे एस एस, म्हेत्रे एस एच,  वीर आर बी,  दत्ता डावकरे ,  उत्तम काळे,  हनुमंत माने  यांनी सहकार्य केले.

 
Top