उमरगा / प्रतिनिधी- 

 उमरगा तालुक्यामध्ये अवैध दारुविक्री ,गुठका विक्री पठोपाठ मटका व जुगाराचे प्रमाणही मोठ्या जोमात सुरु झाले आसुन याकडे संबंधित प्रशासन  दुर्लक्ष करत असल्याने  जिल्हा पोलिस अधिक्षकांने लक्ष घालण्याची गरज आहे.

उमरगा तालुका हा उस्मानाबाद,जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका इसुन ह्या तालुक्यात सध्या मटका नावाच्या अवैध धंद्यानी पछाडले आहे. उमरगा तालुक्यामध्ये “ कल्याण -मुंबई, नव्हे तर राजश्री मोर्णिग, श्रीदेवी, माधुरी,टाइम बाजार,राजश्री,मधुर डे,मिलण डे,सुप्रिम डे,राजधानी डे, आदी  प्रकारचा मटका सकाळी ९ वाजल्यापासुन ते रात्री १२ वाजेपर्यंत चालत आसतो हा व्यवसाय करणारे बहुतांश एजंट परप्रांतातले आसुन  या व्यवसायातुन दररोज फोन पे व गुगल पे च्या माध्यमातून दिवसाकठी लाखो करोडोची उलाढाल होत  असुन उमरगा तालुका हा कर्नाटक  व अांध्रप्रदेश, या दोन्ही राज्याच्या सिमेलगत असल्याने या दोन्ही राज्यातिल मटका बहाद्दरांचे परप्रांतीयाचे प्रमुख केंद्र बिंदु ठरला असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.

उमरगा शहरासह तालुक्यातील महत्वाची बाजारपेठेची मोठी गावे तसेच लहान, लहान खेडेगावातसुद्धा तुरोरी, तलमोड, दगडधानोरा, कुन्हाळी, नारंगवाडी, बलसुर,गुंजोटी,दाळींब सास्तुर,आदि गावात मटका व्यवसायीकाचे दलाल निर्माण झाले आहेत.  मटका व्यवसायीकांना मोठे पाठबळ मिळत आहे.त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ होत. या प्रकरणात जिल्हा पोलिस अधिक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. 

 
Top