उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष  डॉ.आप्पासाहेब आहेर,  प्रदेश अध्यक्ष  बन्सीदादा डोके, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता  राजनजी गावंड यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय मराठा महासंघ मराठवाडा प्रमुख दत्ताभाऊ शिनगारे, व भारतीय मराठा महासंघ मराठवाडा सचिव  उमेश दुरूंदे यांच्या उपस्थितीमध्ये परंडा येथे तालुका बैठक पार पडली.  यावेळी भारतीय मराठा महासंघ जिल्हा अध्यक्ष संकेत सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली 

परांडा तालुक्यातील भारतीय मराठा महासंघ च्या नियुक्ती जाहिर करण्यात आल्या आहेत.

 यावेळी भारतीय मराठा महासंघ जिल्हा सरचिटणीस पदी धनंजय बाबासाहेब राजेभोसले, परांडा  तालुका अध्यक्षपदी विजय दिलीप गरड, तालुका उपाध्यक्ष पदी गोकुळ प्रल्हाद डोके, परांडा तालुका चिटणीस पदी नागेश गजेंद्र औताडे,परांडा तालुका युवक अध्यक्ष धनंजय पितांबर गोफणे तर शेळगाव सर्कल प्रमुख पदी बालवीर अंकुश शिंदे यांना नियुक्ती पत्र भारतीय मराठा महासंघ जिल्हा अध्यक्ष संकेत सुर्यकांत सुर्यवंशी यांनी नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे मराठवाडा संपर्कप्रमुख अमरभाई शेख,  संस्थापक अध्यक्ष शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे विष्णू नरेंद्र इंगळे, छावा संघटनेचे आकाश जेधे, हनुमंत कुटे सर व इतर मान्यवर उस्थितीत होते..

 
Top