उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सामान्य माणसाला असामान्यत्व बहाल करून हजारो लोकांच्या जीवनाचे सोने करणारे,विचार आणि उच्चार यांमध्ये सत्यता,स्पष्टता आणि पारदर्शकता असणारे तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व,तमाम मराठी माणसाच्या मनामध्ये आदराचे स्थान निर्माण करणारे हिंदुहृदयसम्राट मराठी मनाचे मानबिंदू वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक उस्मानाबाद येथे  हजारो शिवसैनिकांच्या वतीने बाळासाहेबांच्या प्रतिमेस ओमप्रकाश राजेनिंबाळकर,शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळंब - उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.कैलास घाडगे - पाटील, धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री.मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पुजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.जयंतीनिमित्त उस्मानाबाद शहरात समता नगर ,माऊली चौक,शाहु नगर,संभाजी महाराज चौक,नेहरू चौक येथे नागरीकांसाठी बसण्यासाठी आसन व्यवस्था केली,अन्नपुर्णा येथे गोरगरीबासाठी व रूग्नासाठी अन्नदान,कार्यक्रम घेण्यात आले.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते,माजी नगराध्यक्ष दतात्र्य बंडगर,धाराशिव शहरप्रमुख संजय(आबा) मुंडे,युवा सेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे,नगरसेवक सोमनाथ गुरव,सिध्देश्वर कोळी सर,तुषार निंबाळकर,रवि वाघमारे,बाळासाहेब काकडे,गणेश अचलेकर,प्रविण कोकाटे,दिलीप जावळे,भिमा जाधव,राजाभाऊ पवार,पंकज पाटील,रवि कोरे आळणीकर,संकेत सुर्सुयवंशी,कुणाल धोत्रीकर,महेश लीमये,महेश उपासे,सतिश लोंढे,सुरेश गवळी,बंडू आदरकर,मनोज पडवळ,सुमित बागल,बापु गवाने,साबेर सय्यद,अमन शेख,राम साळुंके,वैजिनाथ नरूने,जिल्ह्यातील हजारो शिवप्रेमी, शिवसैनिक,नागरिक,पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर शिवसैनिक,युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top