उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील दत्त नगरमध्ये लोकसहभाग आणि नगरपालिका स्थानिक विकास निधीतून ओंकारेश्वर महादेव मंदिर परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख सतीश सोमाणी यांच्या संकल्पनेतून झालेला बदल आदर्श ठरला आहे.

उस्मानाबाद शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरातील स्थानिक नागरिक गणेश कदम सुरेश बागल,अजय साळुंखे,ज्येष्ठ नागरिक शिंदे काका बप्पा जाधवर व दत्त नगर परिसरातील नागरिकांनी मंदिर आणि परिसरात बाग बगीचा रंगरंगोटी आणि सुशोभिकरणाचे काम हाती घेतले.

उस्मानाबाद नगरपालिकेच्या मालकीची रिकामी जागा सुशोभीकरणासाठी स्थानिक नागरिकांनी घेतलेला पुढाकार याकरिता आमदार कैलास पाटील निधीमधून या ठिकाणी दहा लाख रुपये खर्च करण्यात आले आणि सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.

दिनांक १९ जानेवारी रोजी ओंकारेश्वर मंदिर परिसरात लोकार्पणाचा कार्यक्रम खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के. चव्हाण, उपकार्यकारी अभियंता शाखा अभियंता एस.व्ही.शिवगुंडे उपस्थित होते.


 
Top