उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापनदिन निमित्त राष्ट्रध्वजा रोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते सकाळी ठिक 9.15 वाजता येथिल श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल मैदान येथे  होणार आहे.येथील जिल्हाधिकारी कार्यालयालयाच्या प्रांगणातील ध्वजारोहण  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या शुभहस्ते  सकाळी 8.15 वाजता होणार आहे.

  ध्वजारोहणाच्या या कार्यक्रमाच्या दिवशी विविध मागण्या संदर्भात लोक, संघटना, पक्ष, कार्यकर्ते हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, ध्वनीक्षेपकाचा वापर,धरणे, मोर्चा, रॅली, आत्मदन, रस्ता रोको अशा कार्यक्रमाचे आयोजन करतात.

 शहरातील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल आणि  श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते सर्कीट हाऊस शिंगोलीपर्यंत दि.25 जानेवारी -2022 रोजी  00.00 वाजल्यानंतर ते दि.26 जानेवारी 2022 च्या रात्री बारा वाजेपर्यंत  आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास बंदी आदेश काढणे आवश्यक असल्याचे  जिल्हादंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या पूर्वतयारी बैठकीत ठरविण्यात आले आहे.

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये तसेच श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल आणि श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा ते सर्कीट हाऊस शिंगोली पर्यंत ध्वजारोहणाच्या दिवशी उपद्रव कमी करण्यासाठी तसेच आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यात येऊ नयेत म्हणून श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल व श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा ते सर्कीट हाऊस शिंगोली पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे.असे उपविभागीय दंडाधिकारी योगेश खरमाटे यांनी कळविले आहे.


 
Top