उस्मानाबाद (प्रतिनिधी)

आजच्या जागतिकीकरण व इंटरनेटच्या काळात आपली मराठी भाषा कायम टिकविण्यासाठी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा व “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” विविध उपक्रमांनी साजरा करतानाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली पतिभा जागृत ठेऊन साहित्याची निर्मिती करावी व आपल्या सुप्त कलागुनांचा विकास करावा असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील मराठी विभाग आयोजित “नराठी भाषा संवर्धन पंधरवडा”उपक्रमात १८जानेवारी रोजी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे.

प्रारंभी वि.वा.शिरवाडकर यांचे प्रतिमाचे पुजन प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी यांनी केले.

यावेळी मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डाॅ.शिवाजी गायकवाड यांनी लिहिलेल्या “पाटाकेंजा”काव्यसंग्रहाचे व एस.वाय.बी.ए.च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या “विवेकानंद बुलेटिनचे”प्रकाशन प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे हस्ते करण्यात आले. पुढे बोलतांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,कवी प्रा.डाॅ.शिवाजी गायकवाड यांचा भूतकाळ गरिबीचा होता त्यावर मात करत ते शिकले व प्राध्यापक झाले.ते एक प्रतिभावंत कवी असून त्यांच्या कवितेला ऊंची आहे त्यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी लिहायला सुरवात करावी तर नक्किच महाविद्यालयातील वाद्यार्थ्यामधून नवोदित  प्रतिभावंत कवी निर्मान होतील.

सूञसंचालन प्रा.डाॅ.अरविंद हंगरगेकर यांनी केले प्रास्ताविक प्रा.डाॅ.शिवाजी गायकवाड यांनी केले. यावेळी प्रा.माधव उगीले,प्रा.संजय शेंडगे,प्रा.सौ.बाबर,प्रा.नारायन सकटे व निवडक विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.आभार प्रा.राजा जगताप यांनी मानले


 
Top