उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील कोरोना नियमानुसार मर्यादित विद्यार्थी संख्ये त श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. 

 विद्यार्थीनींनी सावित्रीच्या लेकी वेशभुषा परिधान करुन आल्या होत्या वेशभुषेतील विद्यार्थीनींच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी यांनी महापुरुषाची जयंती साजरी केल्याने विद्यार्थ्यांना महापुरुषांची आदर्श गाथा समजते असे मनोगत व्यक्त केले याप्रसंगी उपप्राचार्य संतोष घार्गे, पर्यवेक्षक वाय . के.इंगळे, के.वाय. गायवाड , टी.पी . शेटे पर्यवेक्षिका भारती गुंड , विभाग प्रमुख एन. आर. नन्नवरे, तानाजी हाजगुडे, कलाध्यापक शेषनाथ वाघ , किरण लोमटे, सहशिक्षक किशोर लामतुरे आदि शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top