उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी देशभरातील पक्ष कार्यकर्ते व हितचिंतकांना नमो अ‍ॅपच्या माइक्रो डोनेशन (अल्प देणगी) स्वरुपात कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 1 हजाराचे योगदान देण्याचे आवाहन केले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी स्वतः पासून सुरुवात करत हे अभियान प्रभावीपणे करुन बूथस्तरावरील सर्व कार्यकर्ते तसेच हितचिंतकांना सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन  केले. माइक्रो डोनेशन अभियान पूर्व पंतप्रधान भारतरत्न श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी 25 डिसेंबर रोजी सुरु होऊन आपले प्रेरणास्थान पं. दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी 11 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील.सर्व माइक्रो डोनेशन कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 1000 स्वरुपातील देणगी योगदान या माध्यमातून व्हावे. जिल्ह्यातील पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी प्रदेश ते मंडल स्तरावरील सर्व मोर्चे प्रकोष्ठ कार्यसमिती सदस्यांनी या माइक्रो डोनेशनद्वारे आपला निधी जमा करुन अभियानाचा शुभारंभ करावा. असे आवाहन जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केले आहे.

 
Top