प्रदीप मुंडे यांच्या समर्थनार्थ 13 संघटनांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन


उस्मानाबाद - सोशल मीडियावर जातीवाचक उपनाम देऊन बदनामी व जातीय तेढ निर्माण करीत असल्या प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या १३ संघटनांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हण्टले आहे की, उस्मानाबाद शहरातील नगरसेवक प्रदीप मुंडे 13 जानेवारी 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयात तारखेसाठी गेले होते सुनावणी संपल्यानंतर ते व विधिज्ञ अमीत कोकाटे हे त्यांच्या गाडीवरून न्यायालय बाहेर जात असताना रस्त्यातून बाजूला सरकण्यावरुन  शाब्दिक चकमक व वाद झाला.सदरील किरकोळ वादाला वेगळे स्वरूप व राजकीय, जातीयवाचक रंग देण्याचा प्रकार केला जात आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

या संदर्भात   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लिगल सेल,जय हनुमान विचार मंच धाराशिव ,अठरापगड जातीच्या मावळ्यांची छावा,शिवराज्याभिषेक सोहळा समिती उस्मानाबाद,मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती,महाराष्ट्र राज्य फार्मसी कृती समिती,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, संभाजी ब्रिगेड, ए.जे.सोशल फाऊंडेशन, जिल्हा विधिज्ञ मंडळ उस्मानाबाद यांचेसह तेरा पेक्षा जास्त संघटनांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक नीवा जैन यांची प्रदीप मुंडे यांनी भेट घेऊन व निवेदन देऊन चर्चा करून कारवाईची मागणी केली आहे यावेळी पोलीस अधीक्षक यांनी दोषीवर लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासीत केले.

 
Top