तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर येथील श्रीतुळजाभवानी मातेच्या  शाकंभरी नवराञउत्सवापुर्वीच्या  मंचकीनिद्रेस  सोमवार दि.3रोजी राञी आरंभ झाला . ही श्रीतुळजाभवानीची मंचकीनिद्रा  सोमवार  दि.१० रोजी पहाटे पर्यत चालणार आहे.नंतर दुपारी बारा वाजता मंदीरात शाकंभरी देवीप्रतिष्ठापने नंतर घटस्थापना करण्यात येवुन शाकंभरी नवराञोत्सवास आरंभ होणार आहे.

सोमवारी सकाळी  दहा वाजता  श्रीतुळजाभवानी मातेचा  मंचकीनिद्रेची तयारी सुरु झाली. यावेळी प्रथम सुवासनीनी कापुस वेचला   नंतर तो पिंजण्यात येवुन गादीत भरल्यानंतर गाद्या शिवुन त्या गाद्या शेजघरातील चांदीच्या पलंगावर अंथरण्यात येवुन देविंजींच्या  मंचकीनिद्रेस शेज घर तयार करण्यात  आले.

 सांयकाळी साडे सहा वाजता अभिषेक पुजेची  घाट करण्यात आली नंतर देविजीस दुग्धअभिषेक घातल्यानंतर मुर्ती स्वच्छ करण्यात आली नंतर ती अलगद हातावरुन शेज घरातील चांदीच्या पलंगावर निद्रस्त करण्यात आली.त्यानंतर  धुपारती करण्यात आली.यावेळी  भोपे पुजारी मंहत, मंदीर विश्वस्त धार्मिक व्यवस्थाप,  मानकरी, मंदीर कर्मचारी उपस्थितीत होते.नंतर मंहत वाकोजीबुवा, गुरुतुकोजीबुवा  यांनी  प्रक्षाळ पुजा करण्यात आल्यानंतर मंदीर बंद करण्यात आले. नंतर देविजींचा मंचकीनिद्रेस आरंभ  झाला.

 
Top