उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

राजकुमार विजयकुमार यादव यांच्या नवीन बळीराजा ॲग्रो गूळ उद्योग उत्पादन सेंद्रिय गूळ (गुराळ) फर्म चा  शुभारंभ हासेगांव (के) धनगरवाडी (ता.कळंब ) भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते संपन्न झाला.

नाविन्यपूर्णरित्या उभारलेल्या या गुराळात सेंद्रिय पद्धतीने,आरोग्य वर्धक गुळाचे उत्पादन केले जाते. व्यवसाय वाढीसाठी राजकुमार यादव यांना मनःपूर्वक शुभेच्छा! व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत‘ संकल्पनेद्वारे उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुण तरुणींना व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करण्यावर आपला भर असणार आहे.   राजकुमार यादव यांचा आदर्श घेऊन नवतरुणांनी उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढे यावे. त्यांना राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज मिळवून देण्यासाठी आपला पाठपुरावा असेल ,असे भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे म्हणाले .

 
Top