उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

स्थानिक आमदार विकास निधी २०२१-०२२ अंतर्गत दत्तनगर काकडे प्लॉट उस्मानाबाद येथील सभामंडपाच्या कामाचे लोकार्पण आणि ओंकारेश्वर महादेव मंदिरामध्ये शिव महादेवाच्या पिंडाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा खासदार ओमराजे निंबाळकर, आ. कैलास घाडगे - पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

याप्रसंगी तालुकाप्रमुख सातिश सोमाणी, पंचायत समिती माजी उपसभापती  श्याम जाधव, कक्ष जिल्हाप्रमुख मोईन पठाण,  बप्पा जाधव, आतकरे साहेब,  सौदागर जगताप,  अमोल मुळे,  पोपट खरात,  बापू थोरात, कार्यकारी अभियंता चव्हाण , कार्यकारी अभियंता  गपाट  यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


 
Top