उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी सहकारमंत्री कर्नाटक -महाराष्ट्र सीमाप्रश्नी चळवळीचे प्रमुख नेते भाई प्रा.डाॅ.एन.डी पाटील यांचे निधन झाल्यामुळे उस्मानाबाद मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई धनंजय उद्धवराव पाटील यांनी श्रध्दांजली वाहिली आहे. 

संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून आजपर्यंत झालेल्या रोजगार हमी, कापूस एकाधिकार, जागतिकरणला विरोध, अंधश्रध्दा निर्मुलन, सेझ यां सारख्या चळवळीचे नेतृत्व भाई एन.डी पाटील यांनी केले या शब्दात श्रध्दांजली अर्पण करत भाई धनंजय पाटील यांनी सामान्य शेतकरी, कष्टकरी कामगारांना न्याय मिळवून देणारे रयत शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ भाई एन.डी पाटील निघुन गेले त्यांचा महाराष्ट्राच्या जडणघडीत सिंहाचा वाटा आहे,त्यांना आखेरचा लाल सलाम , अशा शब्दात धनंजय पाटील यांनी श्रध्दांजली अर्पीण  केली.

 
Top